Pune : विश्वेश्वर बँकेच्या अध्यक्षपदी सुनील रुकारी यांची बिनविरोध निवड

एमपीसी न्यूज- विश्वेश्वर सहकारी बँकेच्या संचालक मंडळाची वर्ष 2019-20 ची निवड सभा नुकतीच पार पडली. यावेळी सुनील रुकारी यांची अध्यक्ष तर सुभाष लडगे यांची उपाध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड झाली आहे. सहाय्यक निबंधक (निवृत्त) अॅड. कमलाकर मांगले यांनी यावेळी निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहिले.

बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीराम आपटे यांनी नवनिर्वाचित अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचे अभिनंदन केले आहे. सुनील रुकारी हे प्रगतशील शेतकरी असून विविध सामाजिक संस्थांशी ते संबंधित आहेत. तर सुभाष लडगे हे बांधकाम व्यवसायिक असून सार्वजनिक बांधकाम विभागातून उपअभियंता पदावरून ते निवृत्त झाले आहेत.

यावर्षी बँकेला सर्वोतोपरी एनपीएमुक्त करण्याचा आमचा उद्देश असून त्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन यावेळी रुकारी यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.