Mumabi : पंतप्रधानांच्या भाषणातून प्रेरणा मिळते – अनुपम खेर

एमपीसीन्यूज : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करोना लढ्यात देशवासियांना पाठबळ देण्यासाठी मंगळवारी आर्थिक मदत जाहीर केली. त्यांचे ते भाषण ऐकून बॉलिवूड अभिनेता अनुपम खेर यांना करोनाशी लढण्याची प्रेरणा मिळाली. या प्रेरणादायी भाषणासाठी त्यांनी मोदींचे आभार मानले आहेत.

जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलतात तेव्हा देशच नाही तर संपूर्ण जग त्यांना ऐकण्यासाठी सज्ज होतं. त्यांच्या भाषणातून प्रेरणा मिळते. १३० कोटी भारतीय जेव्हा आत्मनिर्भरतेचं भांडवल घेऊन एकत्र येतील तेव्हा आपल्या कोणीही थांबवू शकणार नाही.

आपल्याला निश्चित यश मिळेल. २०,००,००० कोटी असे दिसतात. २०००००००००००००! गणित तर ठीक आहे ना?” अशा आशयाचं ट्विट अनुपम खेर यांनी केलं आहे. त्यांचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी देशवासीयांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी २० लाख कोटींच्या आर्थिक पॅकेजची घोषणा केली. सर्व प्रकारच्या उद्योगांना चालना देण्यासाठी हे पॅकेज आहे.

देशांसाठी दिवसरात्र झटणाऱ्या शेतकरी, मजुरांसाठी तसेच प्रामाणिकपणे कर भरणाऱ्या मध्यमवर्गीयांसाठी हे पॅकेज आहे असं नरेंद्र मोदी यांनी सांगितलं.

मागील काही दिवसांपासून संपूर्ण देशच लॉकडाऊन होऊन पडला आहे. त्याला चालना देण्यासाठी केंद्रसरकारकडून काहीतरी जबरदस्त मदत आवश्यक होती. ती या पॅकेजमुळे मिळू शकते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.