Mumbai : मदत व बचाव कार्यासाठी एनडीआरएफच्या 16 टीम राज्यात तैनात

अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी राज्य शासनाची आपत्कालीन यंत्रणा सज्ज आहे. ; 16 teams of NDRF deployed in the state for relief and rescue operations

एमपीसी न्यूज – राज्यात मागील दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. पावसाच्या पार्श्वभूमीवर मदत व बचाव कार्य करण्यासाठी राज्यातील विविध भागात एनडीआरएफच्या 16 टीम तैनात करण्यात आल्या असल्याची माहिती मदत व पुर्नवसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.

मुंबई, कोकणासह राज्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी राज्य शासनाची आपत्कालीन यंत्रणा सज्ज आहे.

राज्यात अतिवृष्टी लक्षात घेऊन राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या 16 टीम राज्याच्या विविध भागात तैनात करण्यात आल्या आहेत. जिल्हा प्रशासन व सर्व आपत्कालीन यंत्रणा सतर्क आहेत. तसेच जनतेला घरातच राहून सुरक्षित राहण्याचे आवाहन ही वडेट्टीवार यांनी केले आहे.

मुंबई 5, कोल्हापूर 4, सांगली 2, सातारा 1, ठाणे 1, पालघर 1, नागपूर 1, रायगड 1 अशा एनडीआरएफच्या एकूण 16 टीम तैनात करण्यात आल्या आहेत.

मुंबईमध्ये बुधवारी रात्री लोकल अडीच ते तीन फूट खोल रुतली. त्यामुळे कर्जत ते सीएसटी मार्गावरील दोन लोकल गाड्या अडकून पडल्या.

त्यामधील नागरीकांना एनडीआरएफच्या जवानांनी सुरक्षित बाहेर काढले. पूर सदृश परिस्थिती लक्षात घेऊन ही पथके तैनात करण्यात आली आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.