Mumbai : अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांचा शिवसेनेला जय महाराष्ट्र; राष्ट्रवादीमध्ये प्रवेश

एमपीसी न्यूज – दूरचित्रवाणीवरील स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेमुळे लोकप्रियतेच्या शिखरावर असलेले अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, छगन भुजबळ, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनजंय मुंडे, ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील, प्रवक्ते नवाब मलिक यांच्या उपस्थित आज (शुक्रवारी) मुंबईत डॉ. कोल्हे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.

डॉ. अमोल कोल्हे हे शिवसेनेचे बडे नेते व स्टार प्रचारक असल्याने हा शिवसेनेला मोठा धक्का मानला जात आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत शिरूर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे संभाव्य उमेदवार म्हणून डॉ. अमोल कोल्हे यांचे नाव चर्चेत पुढे येऊ लागले आहे. शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव आणि मालिकेतील संभाजीची भूमिका करणारे अमोल कोल्हे यांच्यात शिरुरमध्ये लढत होते का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.