Mumbai: महाराष्ट्राला जीएसटी परताव्यापोटी 19 हजार 233 कोटींचा निधी

Funds of Rs 19,233 crore for GST refund to Maharashtra

एमपीसी न्यूज – आर्थिक वर्ष 2019-20 च्या वस्तू व सेवा कर (जीएसटी) परताव्याचा महाराष्ट्राच्या वाट्याचा 19 हजार 233 रुपयांचा निधी आज केंद्र शासनाने जारी केला.

केंद्रीय अर्थमंत्रालयाने आज देशातील राज्य व केंद्रशासित प्रदेशांना आर्थिक वर्ष 2019-20 च्या जीएसटी परताव्याचा 1  लाख 65 हजार 302  रूपयांचा निधी जारी केला आहे.

याच कालावधीत देशात उपकरापोटी 95 हजार 444 कोटींचा निधी संकलित झाला आहे.

देशातील एकूण 31 राज्य व केंद्रशासित प्रदेशांना जारी करण्यात आलेल्या जीएसटी परताव्याच्या एकूण रकमेपैकी महाराष्ट्राच्या वाट्याचा 19  हजार 233 कोटींचा निधीही जारी करण्यात आला आहे.

केंद्राने यावर्षी मार्च महिन्यात जीएसटी परताव्यापोटी राज्य व केद्रशासित प्रदेशांना 13 हजार 806  रूपयांचा निधी जारी केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.