Mumbai : प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते रमेश भाटकर यांचे निधन

एमपीसी न्यूज – मराठी चित्रपटासह छोट्या पडद्यावर आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या हृदयात स्थान निर्माण करणारे प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते रमेश भाटकर यांचे मुंबईत निधन झाले. त्यांनी एलिझाबेथ हॉस्पिटल (नेपेन्सी रोड) येथे अखेरचा श्वास घेतला. ते ७० वर्षाचे होते.

त्याच्या मागे पत्नी, मुलगा असा परिवार आहे. त्यांची पत्नी मृदूला भाटकर या हायकोर्टाच्या न्यायाधीश आहेत.

‘कमांडर’ आणि ‘हॅलो इन्स्पेक्टर’ या त्यांच्या गाजलेल्या टीव्ही मालिका. गायक-संगीतकार वासूदेव भटकर यांच्या घरी 3 ऑगस्ट 1949 मध्ये रमेश भाटकर यांचा जन्म झाला होता. 1977 मध्ये त्यांनी मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले. तीस वर्षांहून अधिक काळ ते अभिनय क्षेत्रात कार्यरत होते. वयाची 69 वर्षे पूर्ण केल्यानंतरही त्यांचा कामाचा उत्साह पूर्वीसारखाच कायम होता. काही दिवसांपूर्वीच ते ‘तू तिथे मी’ आणि ‘माझे पती सौभाग्यवती’ या मालिकेत त्यांनी काम केले होते. याचबरोबर त्यांनी अनेक चित्रपट, टीव्ही मालिका यात काम करून प्रेक्षकांच्या हृदयात स्थान निर्माण केलं.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.