Mumbai News: गोपीनाथ मुंडे आणि न्या. लोया यांच्या मृत्यूचीही सीबीआय चौकशी करा; खासदार अरविंद सावंत

अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्याप्रकरणाचा तपास सीबीआयकडे दिल्याने राज्यातील सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप होत आहेत. : CBI probe into Gopinath Munde and Justice Loya's death; MP Arvind Sawant

एमपीसी न्यूज – अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्याप्रकरणाचा तपास सीबीआयकडे दिल्याने राज्यातील सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप होत आहेत. त्यातच माजी केंद्रीय मंत्री, शिवसेना खासदार खासदार अरविंद सावंत यांनी जस्टिस लोया आणि भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्या मृत्यूचीही सीबीआय मार्फत चौकशी करण्याची मागणी केली आहे.

अभिनेता सुशांत सिंग राजपूत याच्या आत्महत्याप्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्यात आला आहे. त्यावरुन शिवसेना – भाजपामध्ये संघर्ष वाढला आहे.

त्यावरून आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. सुशांतसिंग प्रकरणात आदित्य ठाकरेंची विनाकारण बदनामी केली जात असल्याचे शिवसेनेचे म्हणणे आहे.

शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी सुशांत सिंग प्रकरण सीबीआयकडे देता मग न्यायाधीश लोया आणि भाजपा नेते गोपीनाथ मुंडे यांच्या मृत्यूचीही सीबीआय चौकशी करावी अशी मागणी केली आहे.

सीबीआय चौकशी कधीही करता येते असे नाही. राज्य सरकारने याबाबत केंद्राकडे शिफारस करावी लागते. सीबीआय चौकशी लावण्याचीही काही प्रक्रिया आहे. लोकशाहीचे नियम डावलून कुणीही चौकशी करु शकत नाही, असेही ते म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.