Mumbai News : गृहमंत्री अनिल देशमुख यांना कोरोनाची लागण

एमपीसी न्यूज – महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना कोरोनाची लागण झाली आहे. देशमुख यांनी स्वतः याबाबत माहिती दिली असून आपली प्रकृती चांगली असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

अनिल देशमुख यांनी ट्वीटवर अकाऊंटवर माहिती देत आपली कोरोना चाचणी सकारात्मक आली असल्याचे सांगितले.

_MPC_DIR_MPU_II

‘आज माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असून माझी प्रकृती उत्तम आहे. तरी माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी कोरोना चाचणी करून घ्यावी, असे मी आवाहन करतो. लवकरच मी कोरोनावर मात करून पुन्हा आपल्या सेवेसाठी हजर होईल’, असे गृहमंत्री देशमुख यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.