Mumbai News : अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या सचिवपदी पृथ्वीराज साठे

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवडचे माजी महापौर प्रभाकर साठे यांचे पुत्र पृथ्वीराज साठे यांची अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी ही निवड केली आहे.

प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस असलेले साठे यांनी एनएसयुआयच्या माध्यमातून विद्यर्थी दशेत 1992 साली राजकीय कारकीर्दीस सुरुवात केली. युवक काँग्रेसचे सचिव पद देखील त्यांनी भूषविले होते.

पृथ्वीराज साठे यांच्याकडे आसामचे सहप्रभारी म्हणून देखील जबाबदारी सोपविण्यात आली आहे. पुढील वर्षी आसाम विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर साठे यांच्यावर मोठी जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

पिंपरी-चिंचवडचे माजी महापौर प्रभाकर साठे यांचे ते पुत्र आहेत. पृथ्वीराज साठे यांचे शिक्षण विदेशात झाले आहेत. त्यांनी राहुल गांधी यांच्या पथकात उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांमध्ये 2007 साली काम केले आहे. पक्षाने दिलेली प्रत्येक जबाबदारी त्यांनी उत्तमरीत्या पार पाडली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.