Mumbai News : वाघ, सिंह व इतर वन्य प्राणी दत्तक घ्यायचे आहेत? येथे संपर्क करा

एमपीसी न्यूज – संजय गांधी राष्ट्रीय उद्यान बोरीवली येथील वन्य प्राणी आता दत्तक घेता येणार आहेत. सिंह, वाघ, बिबट, वाघाटी अशा अनेक बंदिस्त वन्य प्राण्यांची देखभाल इथे केली जाते. उद्यानातील बंदिस्त वन्य प्राण्यांना दत्तक घेतल्यामुळे वने व वन्यजीव संवर्धनाच्या अनमोल कार्यामध्ये सहभागी होण्याची संधी सर्वांना मिळणार आहे.

वन्यजीव प्रेमी, संस्था आणि कंपनी यांनी प्राण्यांना एक वर्षाकरिता दत्तक घेऊन वन्यजीव व्यवस्थापनात सहभागी व्हावे, असे आवाहन वनसंरक्षक व संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे संचालक जी. मल्लिकार्जुन यांनी केले आहे.

दत्तक रक्कम एका वर्षासाठी

वाघ – तीन लाख दहा हजार रुपये
सिंह – तीन लाख रुपये
बिबट – एक लाख वीस हजार रुपये
वाघाटी – पन्नास हजार रुपये
नीलगाय – तीस हजार रुपये
चितळ – वीस हजार रुपये
भेकर – दहा हजार रुपये

अधिक माहिती आणि अर्ज करण्याकरीता इच्छुकांनी खालील कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

वन संरक्षक व संचालक संजय गांधी राष्ट्रीय उद्यान बोरीवली (पूर्व) मुंबई 2. अधीक्षक, सिंह विहार, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान बोरीवली (पूर्व) मुंबई

ईमेल – [email protected]
भ्रमणध्वनी क्र – 7020282714

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.