Mumbai : धक्कादायक ! राज्यात कोरोनाचे 18 बळी, 431 नवीन रुग्ण; एकूण मृत्यू 269

एमपीसी न्यूज : राज्यातील कोरोनाबाधितांच्या मृत्यूचा आलेख दिवसेंदिवस उंचावत आहेत. कारण आज ( बुधवारी) राज्यभरात कोरोनाने आणखी 18 रुग्णांचा बळी घेतला आहे. त्यामुळे राज्यात आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 269 वर जाऊन पोहोचली आहे. दरम्यान, आज 431 नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाची भर पडली आहे. तर आजचे 67  असे आजपर्यंत एकूण 789  रुग्ण कोरोनमुक्त होऊन घरी परत गेले आहेत.

राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने याबाबतची माहिती दिली आहे. राज्यभरात कोरोनाने आणखी 18  रुग्णांचा बळी घेतला आहे. त्यामुळे राज्यात आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 269 वर जाऊन पोहोचली आहे. दरम्यान, आज 431  नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाची भर पडली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनबाधित रुग्णांचा आकडा 5649  वर पोहोचला आहे. आजचे 67 असे आजपर्यंत एकूण 789 रुग्ण कोरोनमुक्त होऊन घरी परत गेले आहेत.

आज मृत्यू झालेल्या रुग्णांमध्ये सर्वाधिक 10  रुग्ण एकट्या मुंबईतील होते. त्यानंतर पुणे आणि औरंगाबाद येथे प्रत्येकी दोन तर कल्याण-डोंबिवली, सोलापूर, जळगाव आणि मालेगाव येथील प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. या मृतांमध्ये 14  पुरुष आणि 4  महिलांचा समावेश आहे. यामध्ये 60 वर्षांवरील 5, तर 40 ते 59  वयोगटातील 12  आणि 40 वर्षाखाली एका रुग्णाचा यात समावेश आहे. या 18 पैकी 12  रुग्णांमध्ये मधुमेह, उच्च रक्तदाब आणि हृदयरोग असे अतिजोखमीचे आजार होते.

दरम्यान, आजपर्यंत 90,223 रुग्णांचे घशातील द्रावाचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले हिते. त्यापैकी 83,979 रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह, तर 5649 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असल्याचे निदान झाले. राज्यात सध्या 465 कंटेनमेंट झोन क्रियाशील आहेत. एकूण 6789  सर्वेक्षण पथकांनी 25. 61 लाख लोकसंख्येच्या सर्वेक्षणाचे काम केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.