Mumbai : राज्यात आज 18 मृत्यू, 394 नवीन रुग्णांची भर, 117 रुग्णांना डिस्चार्ज, एकूण कोरोनाबाधित 6817

एमपीसी न्यूज : राज्यात दिवसभरात 18  कोरोनाबधित रुग्णांचा मृत्यू झाला. तर 394  रुग्णांचा वैद्यकीय अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आला आहे. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनबाधित रुग्णांची संख्या 6817  वर पोहोचली आहे. तर आज 117  रुग्ण कोरोनमुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. दरम्यान, राज्यात मृत्यू झालेल्या रुग्णांमध्ये मुंबईच्या 11 आणि पुण्यातील 5  आणि मालेगावातील 2  रुग्णांचा समावेश आहे.

आज मृत्यू झालेल्या 18  रुग्णामध्ये 12  पुरुष आणि 6  महिलांचा समावेश होता. या पैकी 9  रुग्ण 60  वर्षांपुढील होते. तर 6  जण 40  ते 60  वर्ष वयोगटातील होते. मृत 12  रुग्णांना मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, असे गंभीर आजार असल्याचे आढळून आले. कोरोनामुळे राज्यात आतापर्यंत 301  बळी गेले आहेत.

सध्या राज्यातील कोरोना मृत्यू दर हा 4.4  टक्के आहे. राज्यातील 269  कोरोना मृत्यूंमध्ये 50 वर्षाखालील रुग्णांचा मृत्यू दर कमी असल्याचे आढळून आले आहे. विशेषतः 21  ते 30  वयोगटातील मृत्यू दर हा 0.64  टक्के इतका आहे. तर या पुढील वयोगटातील रुग्णांचा मृत्यू दर वाढत असल्याचे दिसून येते. सर्वाधिक 17.78  मृत्यू दर 61 ते 70  वयोगटातील रुग्णांचा आहे.

आज 1,02, 189  रुग्णांचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. त्यापैकी 94, 485  रुग्णांच्या नमुन्यांचा अहवाल निगेटिव्ह आला. तर 6, 817  अहवाल पॉझिटिव्ह आले. राज्यात सध्या 512  कंटेनमेंट झोन क्रियाशील आहेत. आज 702  पथकांनी 28.88 लाख लोकसंख्येचे सर्वेक्षण केले. राज्यात आज घडीला 1,19,161  नागरिक नागरिक होम क्वारंटाईन असून, 8,814  नागरिक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.