BNR-HDR-TOP-Mobile

Dighi : अतिक्रमणावर महापालिकेची धडक कारवाई

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने दिघी-आळंदी रस्ता, जकात नाका परिसरात धडक कारवाई केली. टपरी, किचन ट्रॉली जप्त करण्यात आले.

दिघी आळंदी रस्ता दिघी जकात नाका व परिसर येथे रस्त्यावर अतिक्रमण झाले होते. महापालिकेचे कार्यकारी अभियंता राजेंद्र राणे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण विरोधी कारवाई करण्यात आली. आठ टपरी, दोन काऊंटर, दोन कॉट, जाहिरात फलक, 30 स्टील जाळी, चार किचन ट्रॉली, स्टील जीना असे साहित्य जप्त करण्यात आले. महापालिकेच्या गोडाऊनमध्ये ठेवण्यात आले आहे.

महापालिकेचे 10 पोलीस, एक क्रेन, पाच डंपर, मजूर यांच्या सहाय्याने ही कारवाई करण्यात आली. कारवाईमध्ये बीट निरीक्षक, कनिष्ठ अभियंता पथक क्रमांक तीनचे अधिकारी कर्मचारी यांनी सहभाग घेतला होता. यापुढे देखील वारंवार कारवाई केली जाईल, असे अतिक्रमण विभागाने सांगितले आहे.

Advertisement

HB_POST_END_FTR-A3