-MPC-TOP-MOST-BANNER-I

Bhosari News: महापालिका उभारणार ऑक्सिजन प्लांट

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

एमपीसी न्यूज – कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता आणि ऑक्सिजनची वाढती गरज पाहता महापालिकेच्या वतीने भोसरी येथील नवीन रुग्णालयाजवळ ऑक्सिजन प्लांट उभारण्याचे नियोजन केले आहे. त्यासाठी मोकळया निवासी विभागातील 465 चौरस मीटर क्षेत्र ताब्यात घेण्यास महासभेने मान्यता दिली.

कोरोनाच्या गंभीर रुग्णांना ऑक्सिजनची गरज भासत आहे. ऑक्सिजनचा जाणवणारा तुटवडा लक्षात घेऊन महापालिकेने भोसरी येथे ऑक्सिजन प्लांट उभारण्याचे नियोजन केले आहे. भोसरी येथील नवीन रुग्णालयाचा पूर्वे कडील बाजूस असलेली सर्व्हे क्रमांक 1/3 पैकी 30  मीटर लांबीचा आणि 15.50 मीटर रुंदीच्या 24 मीटर रुंद रस्त्याला लागून असलेल्या मोकळया निवासी विभागातील 465 चौरस मीटर क्षेत्र महापालिकेच्या विकास योजनेत निवासी विभागात सामाविष्ट आहे.

मोकळया निवासी विभागातील 465 चौरस मीटर क्षेत्र ऑक्सिजन प्लांटसाठी खासगी वाटाघाटीने ताब्यात घेण्यास आणि ताब्यात येणा-या क्षेत्राचा मोबदला (30 टक्के दिलासा रकमेसह) संबंधिम नागरिकांना दिला जाणार आहे.

त्यासाठी 13 हजार 300 प्रति चौरस मीटर या दराप्रमाणे 80 लाख 39 हजार 850 रुपये इतके मूल्यांकन केले जाणार आहे. महापालिका जागा ताब्यात घेणार भोसरी येथील संबंधित जागेच्या मालकी हक्काबाबत सातबारा पत्रकावर सामाईक क्षेत्र म्हणून नोंद असून, अनेक नावे आहेत.

त्यामुळे प्रत्यक्षात या जागेच्या मालकीचा बोध होत नाही. साथरोग अधिनियम 1897 आणि आपत्ती व्यवस्थापन कायदा – 2005 मधील कलम 41 अनुसार महापालिका सदर जागेबाबत मालकी हक्क सिध्द झाल्यानंतर संबंधित जागा मालकांना जागेचा मोबदला महापालिकेकडून अदा केला जाणार आहे.

.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1POST DOWn