India Corona Update : संसर्गाचा वेग उतरणीला, सलग दुसऱ्या दिवशी साठ हजारांहून कमी रुग्ण

एमपीसी न्यूज – भारतात मागील काही दिवसांपासून रुग्णवाढ साठ हजारांवर स्थिरावली होती. देशात सलग दुसऱ्या दिवशी साठ हजारांहून कमी कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या चोवीस तासांत देशभरात 53 हजार 256 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे, मागील 88 दिवसांतील ही निच्चांकी रुग्णवाढ आहे. 

आरोग्य मंत्रालयाच्या हवाल्याने एएनआयने याबाबत आकडेवारी प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, देशातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 2 कोटी 99 लाख 35 हजार 221 एवढी झाली आहे. त्यापैकी 2 कोटी 88 लाख 44 हजार 199 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. गेल्या 24 तासांत 78 हजार 190 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला.

 

देशाचा रिकव्हरी रेट वाढून 96.35 टक्क्यांवर पोहोचला आहे. देशात सध्या 7 लाख 02 हजार 887 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. देशातील कोरोना मृतांची संख्या 3 लाख 88 हजार 135 एवढी झाली आहे. मागील 24 तासांत 1 हजार 422 रुग्णांनी आपला जीव गमावला आहे. देशाचा कोरोना मृत्यूदर 1.29 टक्के एवढा झाला आहे.

देशात आजवर 39 कोटी 24 लाख 07 हजार 782 चाचण्या पूर्ण झाल्या आहेत तर, गेल्या 24 तासांत 13 लाख 88 हजार 699 नमूने तपासण्यात आले आहेत. आयसीएमआरने याबाबत आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.

 

देशात 28 कोटी नागरिकांनी घेतली कोरोना प्रतिबंधक लस 
देशात कोरोना लसीकरण कार्यक्रमाअंतर्गत आतापर्यंत देशात 28 कोटी 36 हजार 898 जणांना कोरोना प्रतिबंधक लस टोचण्यात आली आहे. गेल्या 24 तासांत देशभरात 30 लाख 39 हजार 996 जणांना लस टोचण्यात आली आहे. आजपासून देशात 18 वर्षांपुढील सर्वांना मोफत लस दिली जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबाबत घोषणा केली होती.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.