Nigdi : झोपलेल्या तरुणाच्या डोक्यात सिमेंटचा गट्टू घालून खून

एमपीसी न्यूज – रात्री झोपलेल्या तरुणाच्या डोक्यात सिमेंटचा गट्टू घालून खून करण्यात आला आहे. तर खून झालेल्या तरुणाचा भाऊ गंभीर जखमी झाला आहे. ही घटना आज (रविवारी) सकाळी आठच्या सुमारास मिलिंदनगर येथे उघडकीस आली.

तुकाराम शिंदे (वय 22, रा. मिलिंद नगर, निगडी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर सुरेश शिंदे असे जखमी तरुणाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तुकाराम आणि सुरेश मिलिंदनगर येथे भाड्याच्या खोलीत राहतात. शनिवारी ते आपल्या घरी झोपले असता रात्री अज्ञातांनी त्यांच्यावर हल्ला केला. अज्ञात आरोपींनी दोघांवर सिमेंटचे गट्टू मारले. यामध्ये दोघेही गंभीर जखमी झाले. दोघांना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र तुकाराम याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. तर सुरेश याच्यावर सध्या उपचार सुरु आहेत. हा प्रकार आज सकाळी आठच्या सुमारास उघडकीस आला. पोलिसांना याबाबत माहिती मिळताच निगडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरु आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.