Pune News : संगीतकार नरेंद्र भिडे यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन

एमपीसी न्यूज : आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचलेले मराठमोळे संगीतकार नरेंद्र भिडे (वय 47) यांचे आज (10 डिसेंबर) पहाटे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. त्यांचे पार्थिव सकाळी साडेनऊ वाजता डॉन स्टुडिओ येथे अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. तर 11 वाजता वैकुंठधाम येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

आपल्या संगीतातून शास्त्रीय व आधुनिक बाजाच्या सुरांची गुंफण करत आंतरराष्ट्रीय पातळीवर त्यांनी कौशल्य दाखवले.

अवंतिका, ऊन पाऊस, कितीतरी दिवसांनी आज, त्या पैलतीरावर मिळेल मजला, नुपूर, श्रावणसरी ही त्यांची आठवणीतील गाणी गाजली. तर देऊळबंद, पुष्पक विमान, चि सौ कां, अनुमती, पाऊलवाट आणि रानभूल या चित्रपत्रांना त्यांनी संगीतबद्ध केलं होतं.

मनाप्रमाणे काम केल्यास ते लोकांपर्यंत पोहोचते, असं नरेंद्र भिडे कायम म्हणत असत. तुम्ही स्वतःच्या मनाप्रमाणे काम कराल, तेवढं ते अधिक लोकांपर्यत पोहोचेल. तर लोकांच्या कलानं घ्याल, तेवढे त्यांच्यापासून दूर जाल, असेही संगीतकार नरेंद्र भिडे यांनी सांगितले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.