Pimpari Chichwad News : नव्या भक्ती शक्ती उड्डाणपुलाच्या उदघाटनच्या पूर्व संध्येला टिपलेले विहंगम दृश्य

एमपीसी न्यूज : मुंबईहून पुण्याकडे येताना पिंपरी-चिंचवडचे प्रवेशद्वार म्हणून भक्ती-शक्ती समूह शिल्प उद्यान चौकाची ओळख आहे. या चौकात चारही बाजूने शहरातील तसेच, बाहेरील अवजड वाहने सातत्याने ये-जा करतात. त्यामुळे या ठिकाणी वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर बनला आहे. वाहतूक कोंडी व मोठ्या प्रमाणातील वर्दळीमुळे या ठिकाणी मोठ्या संख्येने अपघात होतात. या अपघातांत अनेकांनी आपला जीव गमावला आहे.

त्यामुळे वाहतूक सुरळीत व अधिक सुरक्षित होण्यासाठी महापालिकेने चौकात उड्डाणपूल, ग्रेडसेपरेटर, रोटरी रस्ता बांधण्याच्या कामा सुरु आहे. या उड्डाणपुलाचे रात्रीच्या चांदण्यात अरुण गायकवाड यांनी टिपलेले विहंगमय दृश्य.

छायाचित्र – अरुण गायकवाड 

भक्ती शक्ती चौकातील उड्डाणपुलाचे काम पूर्ण होण्यासाठी आणखी काही महिन्यांचा कालावधी लागणार आहे.

दरम्यान मार्गावरील वाहतूक वळवण्यात आली आहे. मार्गावरील वाहनांना मोठा वळसा घालून जावे लागत असल्याने जुना पुणे-मुंबई महामार्ग सुरू करण्याची मागणी नागरिक आणि राजकीय पक्षांकडून होत होती.

उड्डाणपुलावरील मुंबई-पुणे या एका लेनचे काम पूर्ण झाले असल्याने ही एक लेन वाहतुकीसाठी खुली करण्यात येणार आहे. उड्डाणपुलाचे उदघाटन महापौर माई ढोरे यांच्या हस्ते करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

हा उदघाटन समारंभ आज  (दि. 10) सकाळी दहा वाजता होणार आहे. त्यापूर्वीच राष्ट्रवादीकडून बुधवारी (दि. 9) उड्डाणपुलाचे उदघाटन करण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.