Mutkewadi Chowk Accident : स्कूल बसला वाचवण्याच्या प्रयत्नात भरधाव कंटेनर इमारतीत

एमपीसी न्यूज : पुणे बाजूकडे नाशिक दिशेने (Mutkewadi Chowk Accident) जाणाऱ्या स्कूल बस व कंटेनरचा विचित्र अपघात झाल्याची घटना चाकण जवळील मुटकेवाडी (ता. खेड) येथील चौकात सोमवारी (दि. 29) सकाळी आठच्या सुमारास घडली. स्कूल बसने चौकात अचानक यु टर्न घेतल्याने पाठीमागून आलेला कंटेनर बसला वाचवण्याच्या प्रयत्नात लगतच्या इमारतीवर जाऊन आदळला. यात इमारतीचे त्या समोरील दुचाक्यांचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने या अपघातात कुठलीही जीवितहानी झाली नाही.

पुणे नाशिक महामार्गावरून एक स्कूल बस ( क्र. एम एच 12 क्यू जी 8060) आणि वाहनांची बॅटरी वाहतूक करणारा कंटेनर ( क्र. एन एल 01 ए बी 1235) हि दोन्ही वाहने पुणे नाशिक महामार्गावर नाशिक बाजूने जात होती. पुढे जाणाऱ्या स्कूल बसने चाकण जवळील मुटकेवाडी चौकात अचानक वळण्यासाठी यु टर्न घेतला. बसमध्ये विद्यार्थी असतील या शक्यतेने कंटेनर चालकाने बसला पाठीमागून थोडा धक्का लागल्यानंतर कंटेनर थेट लगतच्या इमारतीवर घातला. या इमारतीचे व इमारतीच्या खालील गाळ्यांचे आणि समोरील काही दुचाकी वाहनांचे कंटेनरच्या धडकेत मोठे नुकसान झाले आहे. कंटेनरच्या समोरील भागाचा इमारतीला (Mutkewadi Chowk Accident) धडकल्याने अक्षरशः चक्काचूर झाला. मात्र, अपघातापूर्वीच कंटेनर चालकाने वाहनातून उडी मारल्याने तो बचावला असल्याचे या चौकातील वाहतूक पोलिसांनी सांगितले.

Illegal rationing in Pune : पुण्यात अवैध रेशनिंगचा साडे सतरा लाखांचा साठा जप्त

दरम्यान स्कूल बसमध्ये विदयार्थी नव्हते; त्यामुळे मोठी दुर्घटना टळली असल्याचे प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी सांगितले. चाकण पोलिसांत रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरु होती. पोलिसांनी दोन्ही वाहन चालकांना ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरु आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.