Pune News – भारतीय विद्या भवनमध्ये ८ जुलै रोजी ‘ नक्षत्रवृक्ष’ कार्यक्रम

एमपीसी न्यूज –  भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत ‘ नक्षत्रवृक्ष ‘  या कार्यक्रमाचे  आयोजन करण्यात आले आहे.शनीवार, ८ जुलै  २०२३ रोजी सायंकाळी साडे पाच  वाजता भारतीय विद्या भवनचे सरदार महादेव बळवंत नातू सभागृह,(सेनापती बापट रस्ता) येथे हा कार्यक्रम होणार आहे.

Pune : सितार नवाज उस्ताद बाले खान संगीत महोत्सवाला प्रारंभ

सेतू अभिवाचन मंच, (Pune News) पुणे यांची ही प्रस्तुती आहे.’ना. मा. संत, इंदिरा संत आणि प्रकाश संत ‘ या मराठी साहित्यातील त्रिदलाला समर्पित हा कार्यक्रम आहे.संकल्पना आणि संहिता गीतांजली अविनाश जोशी यांची आहे.दिग्दर्शन अनिरूध्द दडके यांचे  आहे.व्हायोलिनवादन अनुप कुलथे  यांचे आहे. अनिरुद्ध दडके, मुकुंद दातार, दीपाली दातार आणि गीतांजली जोशी हे अभिवाचन  करणार आहेत.

ना. मा संत, इंदिरा संत आणि प्रकाश नारायण संत ह्या तीन ख्यातनाम साहित्यिकांच्या दुर्लभ साहित्याचे या कार्यक्रमात अभिवाचन केले जाईल.आई ,वडील आणि मुलगा यांच्यातल्या नात्यांचे ,त्यांच्या साहित्यातले प्रतिबिंबही श्रोत्यांपर्यंत पोचविणे,असा या कार्यक्रमाचा उद्देश आहे.भारतीय विद्या भवनचे मानद सचिव प्रा.नंदकुमार काकिर्डे यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली. हा कार्यक्रम विनामूल्य आहे. भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत सादर होणारा हा १७१ वा कार्यक्रम आहे

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.