Nana Patole : राष्ट्रवादीने आमच्या पाठीत खंजीर खुपसला…

एमपीसी न्यूज : जिल्हा परिषद निवडणुकीच्या राष्ट्रवादी-भाजप युतीबाबत मत व्यक्त करताना महाराष्ट्र काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांनी राष्ट्रवादीवर मोठा आरोप केला आहे. नाना पटोले (Nana Patole) म्हणाले, की राष्ट्रवादीने आमच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. राष्ट्रवादीला शत्रुत्व हवे असेल, तर आघाडीतून करा, आम्ही त्यासाठी तयार आहोत. महाराष्ट्र सरकार 3 पक्षांनी (शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस) मिळून स्थापन केले आहे. 

तसेच त्यांनी दिल्लीत ब्रिटिशकालीन असलेल्या देशद्रोह कायद्याच्या स्थगितीबाबत देखील मत व्यक्त केले. ते म्हणाले, की भाजपचे सरकार आल्यापासून देशद्रोह कायद्याचा देशाच्या विविध भागांत गैरवापर होत असून, केंद्र सरकार त्याअंतर्गत निरपराधांना शिक्षा करत आहे. देशद्रोह कायद्याबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो.

Maval MNS : मनसे मावळ तालुका अध्यक्ष वगळता मुख्य आणि सर्व संलग्न अंगीकृत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची पदे बरखास्त

दोन ते अडीज वर्षांनंतर राष्ट्रवादीने आमच्या पक्षाचे काही सदस्य काढून घेतले. त्यात भाजपसह गोंदिया जिल्हा परिषद मिळवली. जर आमचा कोणी शत्रू असेल, तर त्या व्यक्तीने खुलेपणाने दुश्मनी करावी. जर ते आमच्या पाठीत खंजीर खुपसत असतील तर आम्ही त्यांना प्रश्न विचारणारच.  यावर आम्ही आमच्या पक्षश्रेष्ठीसोबत चर्चा करू आणि ते जे सांगतील ते आम्ही करू, असे नाना पटोले (Nana Patole) म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.