Maval MNS : मनसे मावळ तालुका अध्यक्ष वगळता मुख्य आणि सर्व संलग्न अंगीकृत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची पदे बरखास्त

एमपीसी न्यूज – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (Maval MNS) मावळ तालुका अध्यक्ष वगळता मुख्य आणि सर्व संलग्न अंगीकृत संघटनांच्या पदाधिका-यांची पदे आणि त्यांची कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली आहे. नुकत्याच पार पडलेल्या तालुका बैठकीत हा ठराव करण्यात आला. पक्षाच्या दहा सदस्यीय कोअर कमिटीचा नियोजित मावळ दौरा झाल्यानंतर सर्व सेलची तालुका कार्यकारिणी पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते पत्र देऊन नियुक्त केली जाणार आहे.

या बैठकीस नगरसेवक पिं-चिं मनपा -प्रभारी सचिन चिखले,मावळ तालुका अध्यक्ष रुपेश म्हाळसकर, सचिन भांडवलकर,सुरेश जाधव,पांडुरंग असवले,अनिल वरघडे,संजय शिंदे, संतोष मोधळे,भारत चिकणे,तानाजी तोडकर, राहुल मांजरेकर,गणेश भांगरे,संदीप शिंदे,किरण गवळी तसेच कार्यकर्ते उपस्थित होते.

Moshi News : प्राधिकरणातून महापालिकेत वर्ग केलेल्या मिळकतींना किचकट प्रक्रियेतून वगळा

पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे (Maval MNS) यांच्या सूचनेनुसार महाराष्ट्र नवनिर्माण सेना मावळ तालुका अध्यक्ष पद वगळता तालुक्याची सध्या अस्तित्वात असणारी मुख्य व सर्व संलग्न अंगीकृत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची पदे व त्यांची कार्यकारणी (दि ९)रोजी झालेल्या तालुका बैठकीत एकमताने ठराव करून बरखास्त करण्यात आली,असून या पुढे महाराष्ट्र सैनिक हे पद सर्वांसाठी अबाधित राहील. तसेच कोणीही पूर्वीच्या पदाचा वापर किंवा प्रसार या पुढे करू नये अथवा तसे केल्यास आपण पक्षशिस्त भंगाच्या कारवाईस पात्र ठराल अशा प्रकारच्या सुचनाही त्या बैठकीत करण्यात आल्या.

त्या बैठकीत गठीत केलेल्या दहा सदस्यीय कोअर कमिटीचा नियोजित मावळ तालुका दौरा पूर्ण झाल्या नंतरच सर्व सेलची तालुका कार्यकारणी व पदे मनसेचे (Maval MNS) अध्यक्ष राज ठाकरे यांच्या शुभहस्ते पत्र देऊन नियुक्त केली जाईल असेही बैठकीत सांगण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.