Nashik Corona News : नाशिक शहरात एका दिवसात 297 रुग्णांची नोंद

0

एमपीसीन्यूज : राज्यभरात कोरोनाचे रुग्ण वाढत असताना नाशिक शहरातून एक चिंता वाढविणारी बातमी आली आहे. नाशिक शहरात एका दिवसात 297 कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे नाशिककर चिंतेत आहेत.

वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर नाशिक महानगरपालिकेने शहरात भरारी पथक तैनात केली आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून शहरातील लग्नसोहळे, हॉटेल, बार रेस्टॉरंटमध्ये जाऊन कोरोना तपासणी करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.

_MPC_DIR_MPU_II

फिजिकल डिस्टन्स न पाळल्यास तसेच मास न वापरल्यास थेट कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे. त्यासाठी मोठा दंड आकाराला जाणार आहे.

दरम्यान, शहरात एकाच दिवसात 297 रुग्ण आढळून आल्याने प्रशासनाचे धाबे दणाणले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.