Nashik Corona Update : 24 तासांत तब्बल 675 नवे रुग्ण; 389 जणांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज – राज्यात पुन्हा एकदा कोरोनाचा कहर वाढलेला पाहायला मिळत आहे, दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण होत आहे. सोमवारी (दि.8) नाशिकमध्ये 24 तासांत कोरोनाचे 675 नवे रुग्ण आढळून आले आहेत तर 389 जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

_MPC_DIR_MPU_II

आढळून आलेल्या नव्या रुग्णांमध्ये 450 रुग्ण नाशिक महापालिका हद्दीत, 137 रुग्ण नाशिक ग्रामीण भागात, 72 रुग्ण मालेगाव महापालिका हद्दीत तर 16 रुग्ण हे नाशिक जिल्ह्याबाहेरील परिसरात आढळून आले.

नाशिक जिल्ह्यात एकूण 2140 रुग्णांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली असून सोमवारच्या आकडेवारीनुसार नाशिक महापालिका भागातील 4, नाशिक ग्रामीण भागातील 2 अशा एकूण 6 जणांचा मृत्यू झाला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.