Nashik News : शहरातील नागरिकांना क्लाऊड सर्विसेस सुविधा उपलब्ध करून देणार – महापौर सतीश कुलकर्णी

एमपीसी न्यूज – शहरातील नागरिकांना नाशिक महानगरपालिका माहिती व तंत्रज्ञान विभागामार्फत पुरवण्यात येणाऱ्या विविध नागरी सेवांच्या कामकाजात पारदर्शकता यावी, तसेच या सेवा गरिकांना जलद गतीने व विनाविलंब उपलब्ध करून घेण्यासाठी विविध नागरी सेवांचे संगणकीकरण करण्यात आलेली आहे.

या सेवा ऑनलाईन संगणकीय कार्य प्रणालीद्वारे पुरविण्यात येतात यात प्रामुख्याने नागरी सुविधा केंद्रातील विविध पंचावन्न सेवा अंतर्भूत असून यामध्ये हॉस्पिटलचे नोंदणी नूतनीकरण, जैविक कचरा विल्हेवाट नोंदणी, मलनिःस्सारण कनेक्शन परवानगी, नळजोडणी, अग्निशमन नाहरकत दाखले, नवीन मिळकत नोंदणी, थकबाकी दाखला, झोन दाखला, जाहिरात परवानगी, प्लंबिंग लायसन्स, झाडे कटिंग, जन्म-मृत्यू नोंदणी प्रणाली, विविध परवाने, विविध ना हरकत दाखले, परवानग्या इत्यादी तसेच मनपा संकेतस्थळ ऑनलाइन तक्रार निवारण कार्यप्रणाली, नाट्यगृह व फाळके स्मारक ऑनलाईन तिकिट विक्री प्रणाली, पत्र व फाईल मॅनेजमेंट प्रणाली, स्थानिक संस्था कर संकलन प्रणाली तसेच सेवा हमी कायदा अंतर्गत येणाऱ्या विविध ऑनलाईन कार्य प्रणाल्या त्यांचे कामकाज विनाव्यत्यय सुरू राहून नागरिकांना तत्पर सेवा पुरविणे करिता नाशिक महानगरपालिका सातत्याने प्रयत्नशील आहे.

नागरिकांना पुरविण्यात येणाऱ्या सेवा-सुविधा यांचा वापर नागरिकांनी अधिकाधिक मोठ्या प्रमाणावर करावा, असे महापौर सतीश नाना कुलकर्णी यांनी याद्वारे आवाहन केले आहे.

_MPC_DIR_MPU_II

या सेवासुविधा पुरविण्यात येत असताना संकलित होणारा डाटा सुरक्षित ठेवणे तसेच ऑनलाइन पद्धतीने नागरिकांना उपलब्ध होण्याकरिता डाटा सेंटरद्वारे क्लाउडवर एप्लीकेशन होस्टिंग करून त्याद्वारे नागरिकांना सर्व ऑनलाईन सेवा सुलभरीत्या व विना व्यत्यय प्राप्त होण्याकरिता आणि भविष्यात अधिकाधिक सेवा या ऑनलाईन प्रणालीद्वारे उपलब्ध करून देणे कामी डाटा सेंटर द्वारे क्लाउड सर्विस चा वापर करण्याची ची आवश्यकता असल्याचे माननीय महापौर सतीश नाना कुलकर्णी यांनी सूतोवाच केले आहे.

नाशिक महानगरपालिका नागरिकांना देत असलेल्या सुविधा याबाबत महाराष्ट्र शासन माहिती व तंत्रज्ञान विभाग यांनी काही तज्ञ सल्लागार संस्था तीन वर्ष कालावधीकरिता नियुक्त केलेल्या आहेत मे. एस डी एस सॉफ्टवेअर सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड नाशिक ही संस्था नाशिक महानगरपालिकेचे कामकाज करीत असून त्यांची मुदत संपुष्टात येत असल्याने ही सेवा पुढेही अशीच चालू राहावी याकरिता मा. महासभेने ठराव क्रमांक 498 दिनांक 19 जानेवारी 2021 नुसार मंजुरी देण्यात आल्याचे माननीय महापौर सतीश नाना कुलकर्णी यांनी सांगितले.

नाशिक महानगरपालिकेतील सर्व महत्त्वपूर्ण कार्य प्रणाल्या या क्लाऊडवर कार्यान्वित आहे सदरच्या कार्यप्रणाली यांचा नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात वापर होत असून मनपाशी संबंधित विविध दाखले परवानग्या तसेच विविध कर भरणा करणे करिता नागरिक मोठ्या प्रमाणात ऑनलाईन कार्यप्रणालीचा वापर करीत असल्याने याद्वारे प्राप्त होणारा डाटा हा महत्त्वपूर्ण असून त्याची सुरक्षितता ठेवणे हे क्रमप्राप्त आहे ई-गव्हर्नन्स च्या माध्यमातून नाशिक महानगरपालिकेने विविध संगणकीय कार्यप्रणाली तसेच मोबाईल अप्लिकेशन द्वारे पुरविण्यात येणाऱ्या सर्व सेवा या विनाव्यत्यय व सुलभरित्या पुरविणे क्रमप्राप्त असल्याने त्याकरिता डाटा सेंटरच्या सेवा घेणे अत्यावश्यक असल्याचे मा महापौर यांनी सुतोवाच केले.

त्यानुसार या सुविधा भाडेतत्त्वावर उपलब्ध असून या सेवा पुरविणे कामी माहिती व तंत्रज्ञान विभागाचे शासन निर्णय अन्वये काही नामांकित संस्थांची नेमणूक करणेकामी कळविण्यात आले असता मे. डीएसडीएस सॉफ्टवेअर सोल्यूशन नशिक यांनी आपले दर सादर केले त्यानुसार त्यांना सन दोन 20-21 या वर्षाकरिता सेवा पुरवणे कामी येणारा खर्च रक्कम रुपये 78,16, 108 खर्च यास प्रशासकीय मंजुरी देण्यात आल्याचे महापौर सतीश नाना कुलकर्णी यांनी म्हटले आहे त्यानुसार नाशिककर नागरिकांनी महापालिकेने उपलब्ध करून दिलेल्या सर्व सेवा सुविधांचा वापर करून घ्यावा जेणेकरून कामकाज सोयीचे व विना व्यत्यय होणार असल्याने नागरिकांनी जास्तीत जास्त या कार्यप्रणालीचा वापर करण्याचे आवाहन केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.