Nashik Crime News : महाराष्ट्र -गुजरात सीमेवरील कारवाईत दीड कोटींचा मद्यसाठा जप्त

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पुणे भरारी पथकाची कारवाई

एमपीसीन्यूज : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पुणे भरारी पथकाने (Pune flyingSquad of State Excise Department) कारवाई करीत दीड कोटी रुपयांचा मद्यसाठा जप्त (liquor seized) केला. तसेच तिघांना अटक करण्यात आली.

महाराष्ट्र- गुजरात बॉर्डरजवळील ( Maharashtra-Gujrat Border) सुरगाणा तालुक्यातील बर्डीपाडा -परगाणा रस्त्यावर ही कारवाई करण्यात आली.

दरम्यान, राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पुणे येथील पथकाने नाशिक जिल्ह्यात येऊन कारवाई केल्याने हा चर्चेचा विषय ठरत आहे.

पुणे भरारी पथकास मिळालेल्या माहितीच्या आधारे त्यांनी बर्डीपाडा परगाणा रोडजवळील परिसरात छापा टाकला. या कारवाईत दादरा नगर हवेली येथे तयार केलेली व तेथेच विक्रीस परवानगी असलेला मद्यसाठा जप्त केला. त्यात विदेशी मद्याचा साठा मोठ्या प्रमाणात होता.

त्यानुसार पथकाने मद्यसाठा व दोन आयशर टेम्पो, दोन चारचाकी अशा चार वाहनांसह एकूण 1 कोटी 58 लाख 22 हजार 504  रुपयांचा अवैध मद्यसाठा जप्त केला आहे.

या कारवाईत गिरीष भिका पवार (वय -23), हेमंत झांबरु मोरे (वय- 22, दोघे रा. ता. सुरगाणा), शैलेश महादू गावित (वय- 30, रा. वलसाड, रा. गुजरात) यांना अटक करण्यात आली आहे. अधिक तपास सुरू करण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.