Pune Corona Update : पुण्यात 228 नवे कोरोना पॉझिटिव्ह  रुग्ण ; 258 जणांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज : पुणे शहर आणि उपनगरात आज दिवसभरात 228 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. तर 258 कोरोनामुक्त नागरीकांना घरी सोडण्यात आले. 

महापालिकेच्या आकडेवारीनुसार आज 204 जणांची प्रकृती चिंताजनक असून 296 जण ऑक्सिजन बेडवर उपचार घेत आहेत. आज दिवसभरात 6 रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

तर ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या 2 हजार 75 इतकी झाली आहे. आजपर्यंत 1 लाख 77 हजार 664 कोरोनामुक्त नागरिकांना घरी सोडण्यात आले आहे.

महापालिका प्रशासनाकडून पुणेकरांना विनंती केली जात आहे की निर्धास्त न राहता घराबाहेर पडताना विविध ठिकाणी वावरताना तोंडाला मास्क लावा. हँड सॅनिटायजर आणि सोशल डिस्टंन्सिग नियमांचे पालन करण्याचेही निर्देश दिले आहेत.

तसेच सौम्य ते तीव्र लक्षणे आढळल्यास तातडीने अँटीजेन, स्वॅब टेस्टींग करून खबरदारी घ्यावी. तसेच पॉजिटिव्ह आढळल्यास घरातच विलगीकरण करावे. नजिकच्या रुग्णालयात औषधोपचार सुरू करण्याचे आवाहन केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.