Nashik News : *‘उच्च व तंत्रशिक्षण मंत्रालय@पुणे’उपक्रमाच्या माध्यमातून उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सावंत जाणून घेणार अडचणी

आज निवेदने सादर करण्याचे आवाहन

एमपीसी न्यूज – महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागामार्फत ‘उच्च व तंत्रशिक्षण मंत्रालय@ पुणे’ हा उपक्रम राबविला जाणार आहे.

या उपक्रमाच्या माध्यमातून राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत हे उच्च व तंत्रशिक्षण विभागातील मंत्रालय व संचालक स्तरावरील अधिकाऱ्यांसमवेत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे 18 फेब्रुवारी, 2021 रोजी दुपारी 2.00 वाजता इनडोअर हॉल, क्रीडा संकुल सावित्रीबाई फुले, पुणे विद्यापीठ, पुणे येथे प्रत्यक्ष उपस्थित राहून उच्च व तंत्रशिक्षण क्षेत्राशी संबंधित समस्या जाणून त्या सोडविणार असल्याची माहिती नाशिक विभागाच्या प्रभारी सहाय्यक ग्रंथालय संचालक कविता महाजन यांनी एका शासकीय प्रसिद्धीपत्रकान्वये कळविले आहे.

_MPC_DIR_MPU_II

शासकीय प्रसिद्धी पत्रकात नमूद केल्यानुसार, विद्यार्थी, पालक, शिक्षक, प्राचार्य, शिक्षकेतत्तर कर्मचारी, विद्यापीठातील कर्मचारी, वाचक, ग्रंथालयीन कार्यकर्ते व कर्मचारी शैक्षणिक संस्था आदी विविध घटकांच्या अडीअडचणी ऐकून उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत हे सोडविणार असल्याचेही प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे.

प्रसिद्धी पत्रकात नमुद केल्यानुसार, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने उच्च व तंत्रशिक्षण क्षेत्राशी सर्व घटकांच्या सोयीसाठी विद्यापीठाच्या  http://www.unipune.ac.in  या वेबसाईटच्या मुख्य पृष्ठावर उच्च व तंत्रशिक्षण मंत्रालय@ पुणे हे विशेष पोर्टल निर्माण केलेले आहे. या विशेष पोर्टलवर अहमदनगर व नाशिक जिल्ह्यातील नागरिकांना इंग्रजी अथवा युनिकोड मराठीतून आपले प्रश्न मांडता येणार असून निवेदनाची सॉफ्ट कॉपी जोडण्याची व्यवस्थाही करण्यात आली आहे.

त्याअनुषंगाने उच्च व तंत्रशिक्षण क्षेत्राशी संबंधित सर्व घटकांनी आपली निवेदने ऑनलाईन सादर करावेत. तसेच ज्यांना ऑनलाईन निवेदन सादर करणे शक्य होणार नाही, त्यांनीही उपस्थित राहून मंत्रीमहोदयांना आपले निवेदने सादर करावीत, असे आवाहन नाशिक विभागाच्या सहाय्यक ग्रंथालय संचालक कविता महाजन यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

You might also like