Marathi documentary : ‘जक्कल’ या मराठी माहितीपटाला सर्वोत्कृष्ट शोध पत्रकारिता राष्ट्रीय पुरस्कार

एमपीसी न्यूज : नुकताच ६७ वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. त्यामध्ये ‘जक्कल’ या मराठी माहितीपटासाठी सर्वोत्कृष्ट शोध पत्रकारिता (Investigative journalism) या विषयावर निर्माते आणि दिग्दर्शक श्री विवेक वाघ यांना राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. 

शोध पत्रकारिता (Investigative journalism) या प्रकारातील पुरस्कार मिळविणारा हा पहिलाच मराठी माहितीपट आहे त्याबद्दल अ.भा.म. नाट्य परिषदेच्या पिंपरी चिंचवड शाखेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी सत्कार करतांना नाट्य परिषदेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर, प्रसिद्ध सिने अभिनेते  राहुल सोलापूरकर आणि दिग्दर्शक सुनील नाईक इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.