Pune News : राष्ट्रीय नौकानयन स्पर्धेत उदयोन्मुख सलमान, मृण्मयी सर्वांत वेगवान

एमपीसी न्यूज : लष्कराचा सलमान खान आणि महाराष्ट्राची मृण्मयी साळगांवकर यांनी अनुक्रमे पुरुष, महिला विभागात एकेरी स्कल्स प्रकारात विजेतेपद मिळविले. (Pune News) या विजेतेपदाबरोबरच दोघांनी स्पर्धेतील सर्वात वेगवान वेळेची नोंद केली. स्पर्धेत पुरुष विभागात सेनादलाने पुरुष, तर ओडिशाने महिला विभागात सर्वसाधारण विजेतेपद पटकावले. 

सीएमई येथील लष्कराच्या आंतरराष्ट्रीय ट्रॅकवर झालेल्या या स्पर्धेत सलमान, मृण्मयी दोघांनीही 500 मीटरहून अधिक अंतराच्या शर्यतीत वेगवान वेळ देत विजेतेपदावर मोहोर उमटवताना आपली विशेष छाप पाडली.

स्पर्धेच्या अखेरच्या दिवशी हरियानाच्या सलमानने 2018 रियो ऑलिम्पियन दत्तू भोकनळला 5 सेकंदाने पराभूत केले. या शर्यतीचा निकाल फोटो-फिनिशमध्ये लागला. (Pune News) सलमानने 1 मिनिट 32.3 सेकंद अशी वेळ दिली. दत्तू 2014 स्पर्धेतील विजेता आहे. पण, तो स्वतःच्यात 1 मिनिट 31.7 सेकंद या वैयक्तिक वेळेपासून दूर राहिला. त्याने 1 मिनिट 32.8 सेकंद वेळ दिली. महाराष्ट्राने पुरुष विभागात सात वर्षांच्या प्रतिक्षेनंतर रौप्यपदक मिळविले.

Chinchwad Bye-Election : पी.के. इंटरनॅशनल स्कूलमधील मतदार केंद्रात बोगस मतदान; शिवसेनेच्या माजी नगरसेविकेचा गंभीर आरोप

महिलांच्या अंतिम लढतीत महाराष्ट्राच्या मृण्मयीने 1 मिनिट 53.5 सेकंद अशी वेळ देत सुवर्णपदक मिळविले. तिने श्वेता ब्रह्मचारीला (1 मिनिट 55.0 सेकंद) सहज मागे टाकले. नाशिकच्या असणाऱ्या मृण्मयीने या स्पर्धेत विशेष कामगिरी करताना दुसरे सुवर्णपदक पटकावले. यापूर्वी मृण्मयीने 2000 मीटर शर्यतीत सुवर्णपदक मिळविले होते.

स्पर्धेत महाराष्ट्राच्या तेजस शिंदे आणि ओंकार म्हस्केने 1 मिनिट 26.0 सेकंद वेळ देकाना कॉक्सलेस दुहेरीत रौप्यपदक मिळविले. सेनादलाच्या शगनदीप सिंग आणि परमिंदर सिंग (Pune News) जोडीने 1 मिनिट 26.4 सेकंद वेळ देत 2000 मीटर शर्यतीतही सुवर्ण यश मिळविले.

सेनादलाने कॉक्सलेस दुहेरीत (पुनित कुमार, आशिष 1 मिनिट 25.7 सेकंद), लाईटवेट डबल स्कल्स (अर्जुन लाल जाट, अजय त्यागी 1 मिनिट 27.0 सेकंद), पॅरा सिंगल स्कल्स (के. नारायण 1मिनिट 43.6 सेकंद) यांनी विजेतेपद मिळविले.

महिला विभागात ओडिशाने तीन विजेतेपदांसह वर्चस्व राखले. यामध्ये अन्सिका भारती-रेश्मा मिंझ (1 मिनिट 45.4 सेकंद, लाईट वेट डबल स्कल्स), सोनाली स्वेन-रितू कौडी (1 मिनिट 48.2 सेकंद, कॉक्सलेस दुहेरी), रिचेल लाक्रा, सोनालिका दास, दीपिका झेस, झराना हस्ती ( 1 मिनिट 39.9 सेकंद, कॉक्सलेस फोर) या शर्यतींचा समावेश होता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.