Navi Mumbai : माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांच्या मातोश्री वत्सलाबाई पाटील यांचे निधन

एमपीसी न्यूज- माथाडी कामगार नेते नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांच्या मातोश्री वत्सलाताई अण्णासाहेब पाटील (वय 65) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. माथाडी कामगार चळवळीची स्‍थापना करणारे दिवंगत आमदार अण्णासाहेब पाटील यांच्या त्‍या पत्नी होत.

वत्सलाताई यांचे पार्थिव उद्या (शुक्रवारी) सकाळी नऊ वाजता माथाडी भवन, तुर्भे, नवीमुंबई येथे अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार असून, तुर्भे येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

माथाडी कामगार चळवळ उभी करताना वत्सलाताई पाटील यांनी दिवंगत आमदार अण्णासाहेब पाटील यांना मोलाची साथ दिली होती. स्व.आमदार अण्णासाहेबांच्या निधनानंतर माथाडी कामगार चळवळ पुढे नेण्यासाठी त्यांनी खंबीरपणे माथाडी नेत्यांना साथ दिली. अखेरच्या श्वासापर्यंत माथाडी चळवळीतील प्रत्येक कार्यक्रमात त्यांनी सहभाग घेतला. त्यांच्या निधनामुळे कामगार वर्गामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.