NDA News : आता मुलींना देखील देता येणार एनडीए परिक्षा ; सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

एमपीसी न्यूज – सर्वोच्च न्यायालयाने मुलींसाठी राष्ट्रीय संरक्षण अकॅडमी (NDA) मध्ये प्रवेशासाठी परीक्षा देण्यास परवानगी दिली आहे. येत्या 5 सप्टेंबरला एनडीएची परीक्षा होणार आहे. प्रवेश प्रक्रिया न्यायालयाच्या अंतिम आदेशाच्या अधीन असणार आहे.

आज सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी दरम्यान महिलांना संधी देण्यास विरोध केल्याबद्दल लष्कराला फटकारले आहे. लष्कराने आपली भूमिका बदलावी, असे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले आहे. न्यायमूर्ती संजय किशन कौल आणि हृषिकेश रॉय यांच्या खंडपीठाने कुश कालरा यांनी दाखल केलेल्या रिट याचिकेत अंतरिम आदेश मंजूर केला. ज्यामध्ये महिला उमेदवारांना एनडीए परीक्षेत बसण्याची परवानगी देण्याची मागणी केली होती.

याचिकेत म्हटले होते की, महिलांना फक्त लिंगाच्या आधारावर एनडीएमध्ये सामिल केले जाऊ शकत नाही. हे समानतेच्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन आहे. त्यामुळे योग्य महिला उमेदवारांना ‘राष्ट्रीय संरक्षण अ‍कॅडमी’ आणि ‘नौदल अ‍कॅडमी परीक्षा’मध्ये बसण्याची आणि प्रशिक्षण देण्याची परवानगी द्या अशी मागणी करण्यात आली होती. हिच मागणी सर्वोच्च न्यायालयाने पूर्ण केली आहे. यामुळे आता मुलींनाही एनडीएची प्रवेश परीक्षा देता येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.