New Delhi : सीबीएसई बोर्डाच्या मार्च महिन्यातील दहावी, बारावीच्या परीक्षा 1 ते 15 जुलै दरम्यान होणार

New Delhi: The CBSE Board's 10th and 12th examinations for the month of March will be held from July 1 to 15

एमपीसी न्यूज – कोरोनामुळे पुढे ढकलण्यात आलेल्या मार्च महिन्यातील सीबीएसई बोर्डाच्या दहावी, बारावीच्या परीक्षा 1 ते 15 जुलै दरम्यान होणार आहेत, अशी माहिती केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल यांनी दिली आहे.

माहिती केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल यांनी ट्विटरवरून एक व्हिडीओ ट्विट करत ही माहिती दिली आहे. सीबीएससी बोर्ड 10 वी आणि 12 वीच्या उर्वरित परीक्षा घेणार असल्याचं आधीच स्पष्ट करण्यात आलं होतं, त्यानुसार आता ही घोषणा करण्यात आली आहे.

मार्च महिन्यात करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकाडाउन जाहीर करण्यात आला. त्यामुळे या परीक्षा स्थगित करण्यात आल्या होत्या. आता या परीक्षा 1 ते 15 जुलै दरम्यान होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर सीबीएसई बोर्डाच्या 10 वी, 12 वीच्या उर्वरित परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या. या परिक्षा होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते पण, नेमकी तारीख जाहीर केली नव्हती. पण, केंद्राकडून नवीन तारखा जाहीर करून विद्यार्थी वर्गाला दिलासा दिला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.