Australian Open : नदाल नादखुळा! 21वं ग्रँडस्लॅम जिंकून रचला नवा इतिहास

एमपीसी न्यूज – स्पेनचा दिग्गज टेनिसपटू राफेल नदालने अंतिम सामन्यात रशियाच्या डॅनिल मेदवेदवला हरवत दुसऱ्यांदा ऑस्ट्रेलियन ओपनचे जेतेपद जिंकले. या विजेतेपदासह नदालच्या खात्यात आता सर्वाधिक 21 ग्रँडस्लॅम जेतेपदे झाली आहेत. असा विक्रम करणारा तो जगातील पहिला टेनिसपटू ठरला आहे.

ऑस्ट्रेलियन ओपनच्या फायनलमध्ये रोमांचक, थरारक टेनिस सामना आज प्रेक्षकांनी अनुभवला. तब्बल साडेपाच तास रंगलेल्या या सामन्यात नदालने मेदवेदेवची झुंज मोडून काढत 2-6, 6-7, 6-4, 6-4, 7-5 असा पराभव केला. अटीतटीचा या सामन्यात पाच सेट्समध्ये राफेलने विजय मिळवला.

सामन्यात पहिल्या सेटमध्ये डॅनेलने नदालला 6-2 अशा मोठ्या फरकाने पराभूत केले. दुसरा सेटही डॅनेलने जिंकला पण यावेळी राफेलने कडवी झुंज दिल्यामुळे डॅनिलने 6-7 ने सेट जिंकला. तिसऱ्या सेटमध्येही डॅनेल जिंकेल असे वाटत असताना राफेलने कमबॅक करत अप्रतिम खेळ दाखवला आणि सेट 6-4 ने जिंकला. चौथा सेटही 6-4 ने जिंकल्यानंतर अखेरचा निर्णायक सेट राफेलने 7-5 ने खिशात घालत सामन्यासह स्पर्धा जिंकत इतिहास रचला.

टेनिसमधील रॉजर फेडरर आणि नोव्हाक जोकोविच या दिग्गजांच्या नावावर प्रत्येकी 20 ग्रँडस्लॅम जेतेपदे आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.