New Year Photography Contest : तुम्ही नववर्षाचं स्वागत कसं केलंत? फोटो शेअर करा आणि जिंका चांदीची आकर्षक भेटवस्तू!

एमपीसी न्यूज – नववर्षाच्या स्वागत (New Year Photography Contest) संपूर्ण जगात प्रचंड जल्लोषात करण्यात येत आहे. एमपीसी न्यूज व देवदत्त फोटोग्राफी स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने ‘स्वागत नववर्षाचे… फोटोग्राफी स्पर्धा’ आयोजित करण्यात आली आहे. चला तर मग नववर्षाचा आनंद शेअर करूयात! नववर्षाचे स्वागत करतानाचा फोटो आम्हाला पाठवा आणि जिंका स्पर्धेचे प्रायोजक असणाऱ्या भोसरी येथील ‘न्यू श्रद्धा ज्वेलर्स’ या नामांकित सुवर्णपेढीने खास विजेत्या स्पर्धकांना कुशल कारागिरांकडून बनवून घेतलेली आकर्षक “सिल्वर फ्रेम (999 चांदी)”!

ही स्पर्धा खालील चार विभागांत होईल व प्रत्येक विभागातून तीन विजेत्यांची निवड करण्यात येईल. भोसरी येथील ‘न्यू श्रद्धा ज्वेलर्स’ या नामांकित सुवर्णपेढीने ही स्पर्धा प्रायोजित केली आहे.

1) नववर्षाचे कौटुंबिक स्वागत (New Year Celebration with Family)
2) नववर्षाचे सामाजिक स्वागत (New Year Celebration with Social Responsibility)
3) नववर्षाचे पर्यावरणपूरक स्वागत (Eco-Friendly New Year Celebration)
4) नववर्षाचे चविष्ट स्वागत (New Year Celebration Food photography)

स्पर्धेचे नियम व अटी – New Year Photography Contest

1) स्पर्धकांनी नववर्षाचे स्वागत करतानाचे स्वतः टिपलेले छायाचित्र [email protected] या ई-मेल आयडीवर पाठवायचे आहे.

2) स्पर्धेसाठी ई-मेल पाठविण्याची अंतिम तारीख 10 जानेवारी 2023 राहील. त्यानंतर ई-मेल पाठविला असल्यास पारितोषिकासाठी त्याचा विचार होणार नाही.

3) या स्पर्धेत जगभरातील कोणीही स्पर्धक सहभागी होऊ शकेल.

Today’s Horoscope 1 January 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

4) एका स्पर्धकाला स्वतः काढलेले एक किंवा दोन फोटो ई-मेलद्वारे पाठविता येतील.

5) फोटो सोबत स्पर्धकाने स्वतःचे पूर्ण नाव, पत्ता, मोबाईल क्रमांक ही माहिती तसेच फोटोला आकर्षक कॅप्शन देणे आवश्यक.

New Year Photography Contest

6) स्पर्धेतील फोटोचे परीक्षण देवदत्त फोटोग्राफी स्कूलच्या वतीने करण्यात येईल. परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील.

7) प्रत्येक विभागात प्रमुख तीन विजेत्यांखेरीज 25 स्पर्धकांना उत्तेजनार्थ ई- प्रमाणपत्र PDF स्वरूपात ई-मेलद्वारे पाठविण्यात येईल.

स्पर्धेचा निकाल 12 जानेवारी 2023 रोजी जाहीर करण्यात येईल. स्पर्धेतील सर्व विजेत्यांना चिंचवड येथे समारंभपूर्वक पारितोषिक प्रदान करण्यात येईल. पारितोषिक वितरणाचा दिवस, वेळ व स्थळ याची माहिती सर्व स्पर्धकांशी वैयक्तिक संपर्क साधून कळविण्यात येईल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.