Nrusinh Saraswati Utsav : श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांच्या उत्सवानिमित्त मठामध्ये भाविकांची गर्दी

एमपीसी न्यूज – आळंदी येथील श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांच्या मठामध्ये सालाबादप्रमाणे या वर्षी सुद्धा श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज यांच्या (शके 1944) वार्षिक उत्सवाचे (Nrusinh Saraswati Utsav) आयोजन करण्यात आले आहे.

शनिवारी पौष शु.नवमीला सकाळी कोठी पूजनाने या उत्सवाला प्रारंभ झाला. श्री नृसिंह सरस्वती स्वामींच्या समाधी दर्शनासाठी सकाळपासून भाविकांनी मठामध्ये मोठी गर्दी केली होती.

उत्सावानिमित्त मठामध्ये आकर्षक अशी फुलसजावट करण्यात आली आहे. श्रींना आकर्षक अशा वस्त्रांनी, हार-फुलांनी सजवण्यात आले होते. तसेच मठ परिसरात मंडप उभारून त्यावर विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.

दुपारी अनेक भाविकांनी मठामध्ये महाप्रसादाचा लाभ घेतला. संध्याकाळी हभप वासुदेव महाराज बुरसे यांचे सुश्राव्य कीर्तन संपन्न झाले. त्यानंतर श्रींच्या मठामध्ये वेदपठण करण्यात आले. श्री नरसिंव्ह सरस्वती स्वामी महाराज यांच्या उत्सवानिमित्त (Nrusinh Saraswati Utsav) मठामध्ये 31 डिसेंबर ते 7 जानेवारीपर्यंत सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.

Marketyard : वकिलाने केला पोलिसांवर हल्ला; वकिलाला अटक

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.