Nigadi : विवाहितेची आत्महत्येप्रकरणी सासरच्या तिघांविरोधात गुन्हा

एमपीसी न्यूज – घरगुती खर्चासाठी माहेरहून पाच लाख रुपये आणण्यासाठी विवाहितेचा शारिरीक आणि मानसिक छळ केला. यातून विवाहितेने गळफास घेऊन सोमवारी (दि. 11) आत्महत्या केली. याप्रकरणी सासरच्या तिघांवर निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

सोनी रुपेश केसरवानी (वय 26) असे मयत विवाहितेचे नाव आहे. पती रुपेश अशोक केसरवानी (वय 36), दिर रितेश केसरवानी (वय 30), सासरे अशोक केसरवानी (वय 55, सर्व रा. यमुनानगर, निगडी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी मयत सोनी यांचा भाऊ मनिषकुमार लवकुश केसरवानी (वय 23, रा. इलाहबाद, उत्तरप्रदेश) यांनी फिर्याद दिली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी सोनी यांना मुलगी झाली म्हणून त्रास देण्यास सुरुवात केली. तसेच घराच्या खर्चासाठी माहेरहून पाच लाख रुपये आण असा तगादा लावला.

अशातच सोनी यांची बहीण घरी आली असता तिच्या सोबत अशोक केसरवानी यांनी गैरवर्तन करत तिचा विनयभंग केला. हे असह्य न झाल्याने सोनी यांनी राहत्या घरी ओढणीने गळफास घेत आत्महत्या केली. याचा पुढील तपास निगडी पोलीस करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.