Chinchwad : पादचाऱ्याला धक्का देऊन 37 हजारांचा ऐवज लुटला

एमपीसी न्यूज – पायी चालत जाणा-या इसमाला पाठीमागून धक्का देत पादचाऱ्याचे 37 हजार रुपये चोरले. ही घटना चिंचवड येथे बुधवारी (दि.13) सायंकाळी सात वाजता घडली.

कृष्णप्रसाद देवेंद्रप्रसाद यादव (वय 30, रा. मध्यप्रदेश) यांनी फिर्याद दिली. त्यानुसार दोन अज्ञात इसमांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कृष्णप्रसाद चिंचवड येथील टेल्को रोडवरून पायी जात असताना पाठीमागून येवून दोन अज्ञात इसमांनी चालता-चालता धक्का दिला व बोलत त्यांच्याकडील रोख रक्कम व मोबाईल असा एकूण 37 हजार 200 रुपयांचा ऐवज चोरला. पुढील तपास एमआयडीसी भोसरी पोलीस करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.