Nigdi : सरकारी झाडावर विद्युत रोषणाई केल्याप्रकरणी निगडी येथे एकावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – बंगल्यासमोरील सरकारी (Nigdi)  झाडावर विद्युत रोषणाई केल्याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 4 नोव्हेंबर ते 17 नोव्हेंबर या कालावधीत झाडावर विनापरवाना विद्युत रोषणाई केल्याने निगडी प्राधिकरणातील ब्रिजभवन बंगल्याच्या मालकावर ही कारवाई करण्यात आली आहे.

महापालिकेचे सहाय्यक उद्यान अधीक्षक राजेश वसावे यांनी निगडी पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दिली आहे. त्यावरून संजय तिवारी या इसमावर महाराष्ट्र मालमत्तेच्या विद्रूपीकरणास प्रतिबंध करण्यासाठीचा अधिनियम 1995 कलम तीन पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986 व कलम 15 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Chakan : …म्हणून चाकण, एमआयडीसीतील वीज पुरवठा झाला होता खंडित

शहरात खाजगी मालमत्ता तसेच महापालिकेच्या मालमत्ता असणाऱ्या झाडांवर देखील नागरिकांकडून विनापरवाना रोषणाई (Nigdi) केली जात आहे. याबाबत पर्यावरण प्रेमींनी महापालिका प्रशासनाकडे तक्रार देखील केली होती.

यावेळी प्रशासनाने पावले उचलली नाही तर पोलिसांकडे तक्रार केली जाईल असा इशारा देखील देण्यात आला होता. पर्यावरण प्रेमींच्या या भूमिकेनंतर महापालिकेने निगडी येथील या प्रकरणात संबंधित बंगला धारकावर गुन्हा दाखल केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.