Talegaon Dabhade : किशोर आवारे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन

एमपीसी न्यूज – जनसेवा विकास समितीचे (Talegaon Dabhade) संस्थापक अध्यक्ष कै. किशोर आवरे यांच्या वाढदिवसानिमित्त तळेगाव शहरात ठीक ठिकाणी सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. याबाबतची माहिती किशोरभाऊ आवारे मित्र परिवाराच्या वतीने देण्यात आली.

गोरगरिबांचे कैवारी म्हणून किशोर आवारे यांचा समाजात नावलौकिक होता. समाजातील दीनदुबळ्या शोषितांना मदत करण्यामध्ये ते कायमच अग्रेसर होते. त्यांच्या जयंतीनिमित्त रविवारी (दि. 19) रामायणाचार्य भास्कर महाराज रसाळ यांचे प्रवचन रुपी सेवा होणार आहे.

Nigdi : सरकारी झाडावर विद्युत रोषणाई केल्याप्रकरणी निगडी येथे एकावर गुन्हा दाखल

प्रवचन झाल्यानंतर महाप्रसादाचे नियोजन करण्यात आले आहे. स्वप्ननगरी अपार्टमेंट समोर इंद्रायणी कॉलनी तळेगाव स्टेशन (Talegaon Dabhade) येथे सायंकाळी सहा वाजता प्रवचन तर सायंकाळी आठ वाजता महाप्रसाद होणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.