Nigdi : खासदार प्रितम मुंढे यांच्यावर आक्षेपार्ह टिप्पणी करणाऱ्या शिक्षकाला फेसबुक लाईव्ह करुन मारहाण (व्हिडिओ)

एमपीसी न्यूज – भाजपचे राम कदम यांनी दहीहंडी उत्सवादरम्यान महिलांविषयी आक्षेपार्ह विधान केल्यानंतर निगडीमधील एका शिक्षकाने बीड लोकसभा मतदार संघाच्या खासदार प्रितम मुंढे यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केले. यावरून पाच ते सहा जणांनी मिळून फेसबुक लाईव्ह पोस्ट केली, त्यामध्ये त्यांनी शिक्षकाला माफी मागण्यास सांगितली आणि त्यानंतर शिक्षकाला मारहाण केली. हा प्रकार शनिवारी (दि. 8) निगडी येथे घडला.

संजय कुऱ्हाडे (वय 44, रा. निगडी) यांनी याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार संतोष बडे, राजेश मुंडे, विशाल देशमुख, श्रीकांत मुंडे, शुभम मुंडे, गणेश कराड आणि त्याच्या सहा साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आमदार राम कदम यांच्या वादग्रस्त विधानावर मंत्री पंकजा मुंडे यांनी मध्यंतरी एक ‘राम कदम केवळ बोलले. ते तसे काही करत नाहीत, करणार नाहीत’ अशा आशयाची फेसबुकवर पोस्ट केली. या पोस्टवर पिंपरी-चिंचवडमध्ये शिक्षक असलेल्या संजय यांनी कमेंट केली. त्यामध्ये ‘तुमची बहीण खासदार प्रितम मुंढे अविवाहित आहे, तिला पळवून नेले तर चालेल का? अशा आशयाची पोस्ट केली. त्यावर आरोपींनी संजय आणि त्यांच्या पत्नीचे फोटो सोशल मीडियावर अपलोड करून त्यावर अश्लील कमेंट्स केल्या.

यानंतर आरोपींनी शनिवारी (दि. 8) सकाळी साडेअकराच्या सुमारास संजय यांना निगडी येथील निवेदिता बँकेसमोर बोलावून घेतले. फेसबुक लाईव्ह सुरू केलं. आधी पोस्ट केलेल्या वक्तव्याची माफी मागायला लावली आणि मग शिवीगाळ करत मारहाण केली. यावरून निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

https://www.youtube.com/watch?v=66xt603NCXc&feature=youtu.be

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.