Pune : पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात मनसे कार्यकर्ते आक्रमक, कुमठेवर रस्त्यावर पीएमपीएमएल बस फोडली.

एमपीसी न्यूज- इंधन दरवाढ आणि रुपयाची घसरण याच्या निषेधार्थ काँग्रेससह अन्य विरोधी पक्षांनी आज भारत बंद पुकारला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सुद्धा या बंदमध्ये सक्रिय उतरण्याचा निर्णय घेतला. मात्र कोणत्याही सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान होणार नाही असं आश्वासन मनसेतर्फे देण्यात आलं असतानाही आज सकाळी मनसे कार्यकर्त्यानी आक्रमक होत कुमठेकर रस्त्यावर पीएमपीएमएल बसच्या काचा फोडल्या. 

सेनापती बापट रस्त्यावर आणि कोथरूड डेपो इथे मनसे कार्यकर्त्यांनी पीएमपीएमएल बस अडवल्याच्या प्रकार घडला असून कर्वे रस्ता, वारजे, पौड रस्ता येथे कडकडीत बंद पाळण्यात आला असून व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवून उत्स्फूर्तपणे बंद पाळला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.