Pimpri : रोडरोमिओ आणि शहरातील अवैध धंद्यांना आळा घालण्याची मागणी

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड शहरातील तसेच मावळ तालुक्यातील होणारा रोडरोमिओंचा सुळसुळाट, तालुका तसेच शहरातील अवैध धंदे यावर आळा घालण्यात यावा, अशी मागणी माहिती अधिकार कार्यकर्ता प्रदीप नाईक यांनी केली आहे. यासंबंधी पिंपरी पोलीस आयुक्त आर के पद्मनाभन यांना निवेदन देण्यात आले आहे.

यावेळी लहुजी शक्ती सेनेचे पुणे जिल्हाध्यक्ष सचिन खिलारे, पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाचे उपाध्यक्ष संतोष खिलारे, युवा उद्योजक मंगेश केंडे साहेब, सामाजिक कार्यकर्ते किशोर गायकवाड आदी उपस्थित होते.

शहरातील शाळा, कॉलेज सुटल्यावर कॉलेज बाहेर रोडरोमिओ फिरत असतात. त्यामुळे आमच्या माता भगिनींना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. तसेच तालुक्यात शहरात मोठ्या प्रमाणावर स्क्रॅप (भंगाराची दुकाने),अनधिकृत बांधकाम होत आहे. त्यावर कारवाई करण्यात यावी. स्क्रॅप दुकानातील कामगारांची चौकशी करून त्यांच्या ओळ्खपत्रांची सखोल चौकशी करण्यात यावी. तसेच काही वेळा मित्र, मैत्रिणी, नातेवाईक रस्त्यावर बोलत असतात. सर्वसामान्य नागरिकांनाही पोलीस अपमानस्पद वागणूक देत आहेत. भारताच्या संविधानानुसार आर्टिकल नंबर 21 नुसार रस्त्यावर, गार्डनमध्ये गप्पा मारणे गुन्हा नाही. मात्र त्यांनाही तुमच्याकडे लायसन आहे का…?कुठून आलात…?काय काम आहे…?इथे का उभे आहात….? पोलीस प्रश्न विचारत असतात, असे या निवेदनात सांगितले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.