Nigdi : अस्ताव्यस्त विजेचे खांब, पत्र्याचे बॉक्स, दुर्गंधीयुक्त कचरा अन् म्हणे स्मार्ट सिटी…!

एमपीसी न्यूज – वापरात नसलेले विजेचे खांब, पत्र्याचे बॉक्स, दुर्गंधीयुक्त (Nigdi ) कचरा ही परिस्थिती आहे पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निगडी येथील संत तुकाराम व्यापारी संकुलाच्या वाहनतळ परिसरातील. ही अवस्था पाहून पिंपरी-चिंचवड खरंच स्मार्ट सिटी आहे का, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.  

पिंपरी-चिंचवड शहराची स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल सुरु असल्याचे सांगितले जाते. प्रत्यक्षात मात्र परिस्थिती विरुद्ध आहे. शहरात अनेक ठिकाणी अस्ताव्यस्त साहित्य पडल्याचे दिसते. कच-याचे, घाणीचे साम्राज्य असते. शहरातील निगडी हा भाग वर्दळीचा आहे. निगडीत महापालिकेचे फ क्षेत्रीय कार्यालय, स्मार्ट सिटीचे कमांड अॅण्ड कंट्रोल सेंटर आहे. त्याचबरोबर महापालिकेचे संत तुकाराम व्यापारी संकुल आहे.

PMC : ‘चलो पीएमसी’च्या नाऱ्यासह विविध मागण्यांसाठी नागरिकांचा पुणे महापालिकेवर मोर्चा

निगडीतील संत तुकाराम व्यापारी संकुलाच्या वाहनतळ परिसरात घाणीचे (Nigdi ) साम्राज्य निर्माण झाले आहे. या परिसरात वापरात नसलेले विजेचे खांब अस्ताव्यस्तपणे पडले आहेत. महावितरणचे वापरात नसलेले पत्र्याचे बॉक्स, लोखंडी सळया अस्ताव्यस्तपणे पडल्या आहेत.

याशिवाय दुर्गंधीयुक्त कचरा एका कोप-यात गोळा करुन ठेवला आहे. याकडे महापालिकेचे दुर्लक्ष होत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.