Nigdi Crime News : निगडी आणि दिघी परिसरातील ऑनलाइन जुगार अड्ड्यांवर पोलिसांचे छापे

एमपीसी न्यूज – ऑनलाईन जुगार खेळवणा-या तसेच ऑनलाइन जुगार घेणाऱ्या दोन जुगार अड्ड्यांवर पोलिसांनी छापे मारले. दोन्ही प्रकरणात पाच जणांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

निगडी पोलीस ठाण्यात महेश केशव शिरसाठ (वय 26 रा. मोरेवस्ती, चिखली) आणि हिमांशु कुमार गुप्ता (वय 20 रा. यमुनानगर, निगडी) या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खंडणी विरोधी पथकातील पोलीस कर्मचारी सुधीर हरिश्चंद्र डोळस (वय 35) यांनी बुधवारी (दि. 14) याबाबत फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निगडीतील टिळक चौक, पवळे उड्डाणपुलाजवळ बुधवारी दुपारी बारा वाजताच्या सुमारास ऑनलाइन लॉटरी जुगार खेळताना दोघेजण मिळून आले. लॉटरी सेंटरचे चालक मालक हे कामगार लोकांना कोणतीही संगणक पावती न देता हस्तलिखित पावतीवर आकडे लिहून दिले. अशा पद्धतीने जुगार खेळताना मिळून आले. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

दिघी पोलीस ठाण्यात आकाश राजेंद्र डुनगे (वय 24), बालाजी राजेश बिडकर (वय 40 (दोघेही रा. काळे कॉलनी देहूफाटा, आळंदी) आणि पंढरीनाथ सूर्यवंशी उर्फ पाटील (रा. गजानन नगर, दिघी) या तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हे शाखा युनिट तीनचे कर्मचारी शशिकांत नांगरे यांनी बुधवारी याबाबत दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी दुपारी पावणे पाच वाजताच्या सुमारास देहूफाटा आळंदी येथील काळे पेट्रोल पंपाजवळ आरोपी यांनी स्वतःच्या फायद्या करिता बेकायदेशीररित्या मोबाईलच्या व्हाट्सअप ग्रुपवर ऑनलाइन जुगाराची आकडेवारी घेतली.

ती आकडेवारी पंढरीनाथ सूर्यवंशी उर्फ पाटील याच्या मोबाईल नंबरवर पाठवून ऑनलाइन जुगार खेळत असताना आरोपी पोलिसांना मिळून आले. त्यांच्याकडून 14 हजारांचे मोबाईल आणि तीन हजारांची रोख रक्कम, असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

दिघी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.