Nigdi Crime News : निगडीत टोळीयुद्ध पेटले; 24 तासात हल्ल्याची दुसरी घटना

एमपीसी न्यूज – निगडीमधील ओटास्कीम येथे गँगवॉरमधून मागील 24 तासात हल्ल्याची दुसरी घटना घडली. पहिल्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा मृत्यू झाला. त्यानंतर मृत्यू झालेल्या तरुणाच्या मित्रांनी त्याच्या हल्लेखोरांवर प्रतिहल्ला केला. यातही एक तरुण गंभीर जखमी झाला आहे.

रामा कांबळे असे दुसऱ्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्याचे नाव आहे. त्याचा मृत्यू झाला असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. मात्र, या माहितीला पोलीस अधिकाऱ्यांनी पुष्टी दिली नाही.

सोमवारी (दि. 19) रात्री निगडी मधील ओटास्कीम येथे सोहेल संतोष जाधव (वय 18), हेमंत खंडागळे (वय 18), गणेश धोत्रे (वय 18), यश उर्फ गोंदया खंडागळे (वय 19), वैभव वावरे (वय 21), श्रवण कु-हाडे (वय 18, सर्व रा. ओटास्कीम, निगडी) या सहा जणांच्या टोळक्याने आकाश उर्फ मोन्या गजानन कांबळे (वय 24, रा. भीमनगर, पिंपरी) याचा चॉपरने भोकसून खून केला.

_MPC_DIR_MPU_II

सुरुवातीला या प्रकरणात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान जखमी आकाशचा मृत्यू झाल्याने गुन्ह्यात कलमवाढ करून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आकाशच्या खुनाचा बदला घेण्यासाठी त्याच्या मित्रांनी पहिल्या प्रकरणातील आरोपींच्या एका साथीदारावर आज (मंगळवारी, दि. 20) दुपारी खुनी हल्ला केला. यात रामा कांबळे हा गंभीर जखमी झाला. त्याचा मृत्यू झाला असल्याची माहिती मिळत असून या माहितीला निगडी पोलिसांनी दुजोरा दिला नाही.

दोन दिवसात खुनाच्या लागोपाठ दोन घटना घडल्यामुळे ओटास्कीम परिसर गँगवॉरने हादरला आहे. शहरात गँगवॉर पुन्हा एकदा डोके वर काढत असल्याचे चित्र यानिमित्ताने दिसत आहे. वेळीच हे प्रकार थांबले नाहीत तर यामुळे पोलिसांची आणि प्रसंगी शहराची डोकेदुखी वाढणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.