Nigdi Crime News : लॉकडाऊनमध्ये नियमांचे उल्लंघन; 262 जणांवर कारवाई, दीड लाखांचा दंड वसूल

लॉकडाऊनच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी निगडी पोलिसांची विशेष मोहीम

एमपीसी न्यूज – लॉकडाऊनची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी निगडी पोलिसांनी सोमवारी (दि. 10) विशेष मोहीम राबवली. या मोहिमेत नियमभंग करणाऱ्या 262 जणांवर पोलिसांनी कारवाई केली. त्यांच्याकडून 1 लाख 61 हजार 200 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

निगडी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील रावेत ब्रीज कॉर्नर व त्रिवेणीनगर येथे नाकाबंदी लावण्यात आली.

_MPC_DIR_MPU_II

त्यात वेगवेगळी पथके तयार करुन ठिकठिकाणी विनाकारण फिरणा-या 72 इसमांवर कारवाई करुन त्यांच्याकडून 48 हजार 100 रुपये दंड, मास्क न वापरणाऱ्या 129 इसमांवर कारवाई करुन त्यांच्याकडून 64 हजार 500 रुपये दंड, सोशल डिस्टन्सींगचे पालन न करणा-या 37 इसमांवर कारवाई करुन त्यांच्याकडून 19 हजार 500 रुपये दंड, 20 वाहनांवर कारवाई करुन त्यांच्याकडून सात हजार 100 रुपये दंड, शासकीय आदेशाचे पालन न करता आस्थापना चालू ठेवणा-या चार आस्थापनांवर कारवाई करुन त्यांच्याकडून 22 हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उप आयुक्त (परिमडंळ 1) मंचक इप्पर, सहाय्यक पोलीस आयुक्त (पिंपरी विभाग) डॉ. सागर कवडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जवादवाड, पोलीस निरीक्षक (गुन्हे) कृष्णदेव खराडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक लक्ष्मण सोनवणे, अन्सार शेख, विरेद्र चव्हाण, विजयकुमार धुमाळ पोलीस उपनिरीक्षक रावसाहेब बांबळे, ताकतोडे व निगडी पोलीस ठाणेकडील पेट्रोलींग पथकाचे पोलीस हवालदार ढोले आणि त्यांच्या पथकाने केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.