Nigdi : शहीद झालेल्या मुलाची इच्छा पूर्ण करणाऱ्या वडिलांची फसवणूक

एमपीसी न्यूज – सैन्य दलात असलेल्या मुलाची शेवटची इच्छा (Nigdi) होती की, उच्च तंत्रज्ञान व व्यावसायिक प्रशिक्षणासाठी युवकांना सुविधा होईल, अशी एखादी संस्था स्थापन करावी. मात्र मुलाला वीरमरण आले. त्याचे स्वप्न त्याचे वडील पूर्ण करत होते. मात्र त्यांची त्यात फसवणूक झाली. हा प्रकार 20 ऑगस्ट 2017 ते 2 ऑगस्ट 2023 या कालावधीत निगडी येथे घडला.

राजेंद्र भीमराव बारपट्टे (वय 65, रा. निगडी) यांनी याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार रतन ब्रिजलाल सोनकर (वय 49, रा. पिंपरी), सतीश सोनकर (वय 49, रा. पिंपळे सौदागर) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा मुलगा कुणाल बारपट्टे हा सैन्य दलात होता. त्याला उच्च तंत्रज्ञान व व्यावसायिक प्रशिक्षणासाठी युवकांना सुविधा करण्यासाठी एक संस्था स्थापन करायची होती. दरम्यान त्याला वीरमरण आले. त्याची शेवटची इच्छा फिर्यादी यांनी पूर्ण करण्याचे ठरवले.

संस्था स्थापन करण्यासाठी जागा मिळवून देतो म्हणून आरोपींनी (Nidhi) फिर्यादी यांचा विश्वास संपादन केला. जागेचे साठीखत करार करून फिर्यादीकडून वेळोवेळी 59 लाख 50 हजार रुपये घेतले.

त्यानंतर मूळ जागा मालकाला 10 लाख रुपये, रजिस्ट्रेशन व मुद्रांक खर्च 10 लाख रुपये आणि कंपाउंडसाठी 50 हजार आरोपींनी दिले. उर्वरित 39 लाख रुपये न देता तसेच जागेचे खरेदीखत करून न देता फिर्यादी यांची फसवणूक केली. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

Pimpri : स्वच्छ सर्वेक्षण केंद्राचे पथक शहरात

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.