Pimpri : स्वच्छ सर्वेक्षण केंद्राचे पथक शहरात

एमपीसी न्यूज – स्वच्छ सर्वेक्षण 2023 अंतर्गत केंद्र शासनाचे (Pimpri) पथक पिंपरी-चिंचवड शहरात दाखल झाले आहे. झोपडपट्टी, मंडई, बाजारपेठ, लोकवस्ती, मोशी कचरा डेपो, मैला सांडपाणी शुद्धीकरण केंद्र, सार्वजनिक शौचालये, स्वच्छतागृहे, रस्ते, दुभाजक तसेच, आरोग्य विभागाच्या कामकाज आदींची पाहणी पथकाकडून केली जाणार आहे.

स्वच्छ सर्वेक्षणासाठी दरवर्षी केंद्राचे पथक फेब्रुवारी महिन्यात शहरात येते. मात्र, यंदा जुलै महिन्यात केंद्राचे पथक शहरात दाखल झाले आहे. ते शहरातील विविध भागांत पाहणी करत आहेत.

शहरातील आठ क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील एक किंवा दोन भागांची पाहणी करणार आहे. दाट लोकवस्ती, झोपडपट्टी, सार्वजनिक व सामुदायिक शौचालय, स्वच्छतागृह, रस्ते, दुभाजक, सुशोभीकरण आदींची पाहणी करण्यात येत आहे.

मंडई, बाजारपेठ, मोशी कचरा डेपो, मैलासांडपाणी शुद्धीकरण केंद्र, ड्रेनेज लाइन आदींची पथक पाहणी करणार आहे. तसेच, (Pimpri) महापालिकेच्या आरोग्य विभागाचे आणि मोशी कचरा डेपो येथील व्यवस्थापन व कामकाजही तपासणार आहेत. नागरिकांशीही संवाद साधणार आहेत.

Kiwale : क्रिप्टो करंसीमध्ये गुंतवणुकीच्या बहाण्याने साडेसहा लाखांची फसवणूक

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.