Kiwale : क्रिप्टो करंसीमध्ये गुंतवणुकीच्या बहाण्याने साडेसहा लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज – क्रिप्टो करंसीमध्ये गुंतवणूक केल्यास 30 टक्के (Kiwale) नफा मिळेल असे आमिष दाखवून चार जणांनी मिळून एका व्यक्तीची सहा लाख 45 हजार रुपयांची फसवणूक केली. ही घटना 20 जुलै ते 26 जुलै या कालावधीत किवळे येथे घडली.

37 वर्षीय तरुणाने याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.  त्यानुसार दोन महिला, महेश अग्रवाल, आदित्य बन्सल (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना एका आरोपी महिलेने टेलिग्रामवर पार्टटाईम जॉबसाठी एक लिंक पाठवली. त्यानंतर अन्य आरोपींनी क्रिप्टो करंसीमध्ये गुंतवणूक केल्यास 30 टक्के अधिक नफा मिळेल, असे आमिष दाखवले.

Indapur News : अखेर चौथ्या दिवशी ‘त्या’ मजुरांचे मृतदेह सापडले

त्यानुसार फिर्यादी यांनी वेगवेगळ्या बँक खात्यावर, युपीआय (Kiwale) आयडीवर सहा लाख 45 हजार रुपये पाठवले. त्यानंतर आरोपींनी फिर्यादी यांना कोणताही नफा अथवा गुंतवलेली रक्कम न देता फिर्यादी यांची फसवणूक केली. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.